पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आड किल्ला,डुबेरकिल्ला व औंढाकिल्ला

इमेज
 घुम्मकड रविवार 23जानेवारी 2021रोजी नेहमी प्रमाणे मी व ट्रेक पार्टनर अंशुमन ने जोरदार गार वारे व बोचऱ्या थंडीचा मारा झेलत सह्याद्रीच्या मायाजाला कडे केलेली कूच❤️ तर आजचा ठरलेला ट्रेक होता,आड वाटेवरचा आड किल्ला व खतरनाक असा औंढा किल्ला. तर मग नेहमीच्या सिरस्त्या प्रमाणे सौ.ने पहाटे उठून बनवून दिलेला टिफिन व अंशुमन ने आदल्या रात्रीच उद्याच्या ट्रेकच्या दृष्टीने बैजवार काढून ठेवलेले सामान घेऊन नेहमीप्रमाणे दोघांच्या सॅक पॅक केल्या व गाडीला किक मारून देवळाली,भगूर-पांढुर्ली फाटा मार्गे घोटी-सिन्नर मार्ग गाठला.हरसुली गावापासून पुढे सोनारीमार्गे किल्ल्याच्या पायथ्याच्या आडवाडीकडे प्रस्थान केले.  सकाळी साधारण ८:४०वाजता वरच्या अडवाडीत पोहोचलो,व तिथुन पुढे आड किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो.   गाडी वरून उतरलो तर अंशुमनच्या भुवया व पापण्यासुद्धा मातकट-भुरकट दिसत होत्या.मला वाटले की कच्चा रस्ता असल्यामुळे रस्त्याच्या धुळीमुळे असे झाले असावे पण रात्री घरी आल्यावर टीव्ही वरील बातम्यांमध्ये कळले की पाकिस्तान(कराची) वरून आलेल्या धुळीच्या वावटळीमुळे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा त्याचा परिणाम...
 SON OF SAHYADRI बऱ्याच दिवसांपासून मिस होत असलेल्या ट्रेकची आज शेवटी भट्टी जमुनच आली🙏🏻 सातमाळेच्या उपरांगेतील मनमाड रेंज मधील असलेले काहीसे अपरिचित व अडवळणी असलेले किल्ले म्हणजे कात्रा व मेसणा मागे जुलै मध्ये त्याच रांगेतील  गोरखगड,अंकाई-टंकाई एका दिवसात भरपूर तंगडतोड करून केले होते,त्याच वेळेस ठरवले की कात्रा व मेसणाची भटकंती सुद्धा अशीच एका दिवसात करून टाकू! पण जुलै(२०२१)पासून तसा तिकडे भटकंती करण्याचा योग काही जुळून येतच नव्हता,शेवटी आज १६जानेवारी२०२२ला कात्रा व मेसणाची भटकंतीचा ताळमेळ बसलाच 😍 सकाळी ६वाजेच्या दरम्यान मी व अंशुमनने सर्व आवरसावर करून  कडाक्याच्या थंडीत मुंबई-आग्रा रोड मार्गे चांदवड  गाठले.  चांदवड-मनमाड रोडने चांदवडच्या पुढे दुगांव पासून उजव्या बाजूला एक फाटा फुटतो त्या मार्गे गंगावे,निंबाळे,रायपूर,वडगांव पंगू वरून कात्रा किल्ल्याचे पायथ्याला असलेले गांव कातरवाडी सकाळी ८.३०च्या दरम्यान गाठले🙏🏻 (कारण आधी आम्ही कात्रा किल्ल्याची भटकंती करून नन्तर मेसणा किल्ल्याची भटकंती करू असे ठरवले होते) योगायोगाने किल्ल्याच्या पायथ्याला जिथे गाडी लावली त...

फिरस्त्या!

 सुख म्हणजे नेमके काय असते?           नववर्षाच्या पहिल्या रविवारी पहाटे पहाटे कडाक्याच्या थंडीत दुचाकीला मारलेली किक व सेलबारी-डोलबारी रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच,राकट,धडकी भरवणारे ताशीव कडे,मराठ्यांनी आमने सामने लढाई करून मुघलांना आपल्या तलवारीचे पाणी जिथे पाजले अश्या ऐतिहासिक किल्ल्याकडे केलेली कूच🙏🏻 चि. अंशुमनने व मी बऱ्याच दिवसांपासून एका दिवसात व कमीतकमी वेळेत जबरदस्त व शारीरिक क्षमतेची कसोटी जोखणारा ट्रेक केला नव्हता,तसा डिसेंम्बर मध्ये खडतर असा AMK केला होता, पण कमीतकमी वेळेत शारीरिक क्षमतेची कसोटी जोखणारा ट्रेकचा योग जुळलाच नव्हता! म्हणजे तशी संधी म्हणा किंवा ताळमेळ बसत नव्हता. चि.अंशुमन व मी गेल्या दोन वर्षांपासून(कोरोना काळ)आम्ही दोघांनीच आमचा एक ग्रुप बनवला आहे व त्याचे नामकरण सुद्धा केले SON_OF_SAHYADRI व जमेल तसे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत फिरण्याचा छंद जोपासला आहे🙏🏻 मग ह्या अश्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या ट्रेकची अनावर इच्छा आम्ही साल्हेर-सालोटाची एका दमात भटकंती करून पूर्ण करू असा विचार केला! रविवारी पहाटे निघून आम्ही सकाळी ...